शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

३० वर्षीय महिलेची दोन मुलींसह आत्महत्या

By दिपक ढोले  | Published: August 26, 2023 10:22 PM

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह कोल्हापुरी बंधाऱ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

जालना  : ३० वर्षीय महिलेने दोन मुलींसह दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडली. शारदा शरद घनघाव (३०), दर्शना शरद घनघाव (४) व हर्षता शरद घनघाव (वय दीड वर्ष), अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

डोंगरगाव येथे शनिवारी सकाळपासून लाइट नसल्याने गावातील विष्णू साहेबराव घनघान लाइनमन व काही ग्रामस्थांसोबत गावाकडील विद्युत रोहित्राकडे जात होते. त्यावेळी गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. याबाबत त्यांनी बदनापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, उपनिरीक्षक शेळके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह कोल्हापुरी बंधाऱ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

याप्रकरणी विष्णू घनघाव यांच्या माहितीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा मृत शारदा घनघाव यांच्या आसरखेडा येथील माहेरकडील नातेवाईक बदनापूर ग्रामीण रुग्णालयात व पोलिस ठाण्यात आले. आपल्या मुलींसह नातींचा घातपात झाला असून, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पोलिस निरीक्षक सुदाम भागवत कर्मचाऱ्यांसह रात्री उशिरापर्यंत बदनापूर ग्रामीण रुग्णालयात हजर होते. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाWomenमहिलाDeathमृत्यू