जालना : आज आधुनिक तंत्रज्ञान व्यवस्थापन केल्यास निश्चित शाश्वत द्राक्ष शेती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त उद्यान विद्या विभाग प्रमुख डॉ. तुकाराम तांबे यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील नाव्हा येथील रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालयात आयोजित द्राक्ष शेती शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तात्यासाहेब बोंद्रे, अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कडवंची परिसरातील द्राक्ष उत्पादकांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. प्राचार्य डॉ. विलास पाटील, सहसचिव लक्ष्मण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून द्राक्ष बागेतील महत्त्वाच्या ऑक्टोबर छाटणी तसेच खरड छाटणी आणि निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीसाठी शिबिराचे आयोजन केले होते.
डॉ. तांबे यांनी द्राक्ष शेती बद्दल तंत्रशुद्ध माहिती दिली. द्राक्षांमध्ये असणाऱ्या विविध छाटणीचे महत्त्व त्यांनी सांगितले. लक्ष्मण कुलकर्णी, प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी कृषी महाविद्यालयाकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. प्रवीण घुबे, डॉ. सतीश पवार, डॉ. प्रदीप सांगळे, विकास भुसारे, प्रा. अनिता सानप, रामेश्वर कोल्हे, प्रा. प्रियंका झिने यांच्यासह द्राक्ष उत्पादकांची उपस्थिती होती.
फोटो