लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : परतूर तालुक्यातील आष्टीसह आसनगाव, को. हादगाव, धामणगाव, पांडेपोखरी, लिंगसा या भागात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड झाली आहे. तसेच चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन, मुगाची उगवण क्षमताही चांगली आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून हरीण, वनगाय, डुक्कर, माकड या प्राण्यांनी ग्रामीण भागात हैदोस घालून कोवळ््या पिकांची नासधूस सुरू केली आहे.हे वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्याने अनेक शेतकरी रात्रं- दिवस पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात तळ ठोकून रहात आहेत. तर अनेक शेतात कपाशीचे पूर्ण प्लँट हरणाने खाऊन संपविले आहेत. मागील काही वर्षांपासून शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्युहात अडकला आहे.यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी विविध बियाणांची पेरणी केली. त्यामुळे यंदा तरी चांगले पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, आता वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्याने वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले.शेतक-यांनी वन्य प्राण्यांसाठी शेतामध्ये बुजगावणे लावले आहेत. मात्र, याचाही काही फायदा होत नसल्याचे शेतक-यांनी सांगितले.पारडगाव : हरणांनी केला पिकाचा नाशपारडगाव : घनसावंगी तालुक्यातील अंतरवाला बु., पागरा, शेवगा शिवारात हरणाच्या कळपाने हैदोस घातला आहे. यामुळे शेतकरी वैतागळे आहेत. या परिसरात यंदा प्रथमच पावसाने वेळेवर हजेरी लावली होती.यामुळे बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू, आता उगवण झालेल्या कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची नासधुस वन्य प्राण्यांकडून होत आहे. यामुळे शेतकरी हताश झाला आहे. या बाबत आसद कुरेशी म्हणाले, मी ११ कपाशीचे बॅग लावल्या होत्या.यावर अमाप खर्च केला होता. पण, आता उगवून आलेले कोंब हरणाच्या कळपाने नष्ट केले आहेत. विशाल खरात म्हणाले, वन्य प्राण्यांच्या भीतीने आंम्ही रात्रभर शेतामध्ये जागरण करतोत. तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने कुंपनावर अनुदान द्यावे.
हरणांसह वन्य प्राण्यांचा कोवळ्या पिकांवर ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:07 AM