जालना : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे २०१९- २० व २०२०-२१ मधील गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राथमिक, माध्यमिक गटातून प्रत्येक तालुक्यातून चार-चार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे, तसेच शाळांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
जालना तालुक्यातील २०१९-२० साठी सारवाडी शाळेवरील शिक्षक ज्ञानेश्वर गिराम, पानशेंद्रा शाळेतील सहशिक्षिका तनुजा शिंदे यांची निवड झाली. बदनापूर तालुक्यातून बाजार वाहेगाव शाळेतील सखाराम खरात, लालवाडी शाळेतील मंदा पाटोळे यांची निवड झाली. अंबड तालुक्यातून वलखेडा शाळेतील उर्मिला शेळके, शेवगा शाळेतील दिलीप अवधूत यांची निवड झाली. भोकरदन तालुक्यातून चिंचोली (नि.) येथील गणेश सातपुते व बरंजळा (सा.) येथील राधा लांडगे यांची निवड झाली आहे. मंठा तालुक्यातून बेलोरा येथील रामकिसन मिसाळ, केंधळी शाळेतील सुषमा शेळके यांची निवड झाली. परतूर तालुक्यातून दहिफळ (भों) शाळेतील पेंटू मैसनवाड, वाहेगाव शाळेतील राधाकिसन सोम्मारे यांची निवड झाली. घनसावंगी तालुक्यातून आवलगाव (बु.) शाळेतील नीलेश जोशी, घोन्सी (बु.) शाळेतील सोनाली पवार यांची निवड झाली. जाफराबाद तालुक्यातून धनगरवाडी शाळेतील बी. डी. खरात, बुटखेडा शाळेतील प्रतिमा आराख यांची निवड झाली.
माध्यमिक विभागातून जालना येथील कन्या शाळेतील प्रभा जाधव, सावंगी तलान येथील शेख फैय्याज यांची निवड करण्यात आली. जीवन गौरव पुरस्कारासाठी सेवली येथील मुख्याध्यापक विश्वनाथ चव्हाण, सिंधीपिंपळगाव येथील जिजा वाघ, केळीगव्हाण येथील तान्हाजी राठोड, गेवराई बाजार येथील सत्यवान खरात, गेवराई बाजार येथील भास्कर चव्हाण, डोणगाव येथील श्रीधर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. आदर्श शाळा पुरस्कारासाठी सावरगाव हाडप, राणी उंचेगाव येथील शाळांची निवड झाली.
सन २०२०-२१ पुरस्कारासाठी पिंपळवाडी येथील मुन्सिफ हुसेन, सिरसवाडी येथील एस. पी. कुलकर्णी यांची निवड झाली. बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील सोमेश कोळी, उजैनपुरी येथील केशर सारूक यांची निवड झाली. अंबडमधून ठाकूरवाडी येथील विठ्ठल धुमाळ, शेवगा येथील कविता सुरकुटवार यांची निवड झाली. भोकरदन तालुक्यातून विटा येथील गणेश ढाकणे, बालोदवाडी येथील सविता तायडे, मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथील दत्तात्रय राऊतवाड, ब्रम्हनाथतांडा येथील प्रणिता लव्हटे यांची निवड झाली. परतूर तालुक्यातून वालखेड येथील अर्चना खरात, देवळा येथील देविदास कराळे यांची निवड झाली. घनसावंगी तालुक्यातून खडकवाडी येथील के. बी. मेहेत्रे, घोन्सी बु. येथील श्रीरंग भोसले यांची निवड झाली. जाफराबाद तालुक्यातून पापळ येथील कृष्णा सवडे, देळेगव्हाण येथील प्रल्हाद काळे यांची निवड झाली.
माध्यमिक विभागातून सेलगाव शाळेतील राजेंद्र कायंदे, पीरकल्याण येथील जी. जी. राजकर यांची निवड झाली आहे. जीवनगौरव पुरस्कारासाठी चनेगाव येथील सतीश महापूरकर, पोकळवडगाव येथील शामराव पवार, ढालसखेडा येथील बाजीराव गाढवे, शेवगा येथील शिवाजी देवडे, खादगाव येथील मोतीलाल रायसिंग, सोलगव्हाण येथील राजाभाऊ घारे यांची निवड झाली. आदर्श शाळा म्हणून जामवाडी, पठार देऊळगाव शाळांची निवड करण्यात आली. या पुरस्काराचे रविवारी वितरण होणार असल्याचे सांगण्यात आले.