जालना : जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या सर्व शिक्षकांच्या सेवा पुस्तिका या अद्ययावत करून पीडीएफ स्वरूपात देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी घेतला आहे. याबाबत प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जिंदाल यांच्याकडे मागणी लावून धरण्यात आली. त्यानुसार आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकानी अनुप जिंदाल यांच्यासमवेत प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली. गांधी जयंती २ ऑक्टोबर पूर्वी शिक्षकांच्या सेवा पुस्तिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकारी यांना देण्याच्या सूचना जिंदाल यांनी दिल्या आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रकरणे १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान निकाली काढण्यात येतील, असे सांगण्यात आले. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व प्राथमिक पदवीधर पदोन्नती प्रक्रिया लवकर राबविण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रकरणे निकाली काढणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाबाबत नियोजन करून चर्चा करण्यासाठी बैठक लावण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिली. यासह इतर विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीस प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, वाल्मिक गिते, पंजाब खिल्लारे, आटोळे यांच्यासह प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राजगुरू, संजय हेरकर, मुकुंद खरात, राजकुमार पिंटेवाढ यांच्यासह प्रहार लिपिक वर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन दांडगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बाला गवळी, उपाध्यक्ष नंदा कानडे, जालना तालुका अध्यक्ष रूपा पेद्दी यांची उपस्थिती होती.
कोट