शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन अध्यापन सुरू राहणार आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी नियमित शाळेत उपस्थित राहतील, कामकाज करतील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, शाळेत विद्यार्थी नसताना शिक्षकांना नियमित उपस्थितीचा आग्रह धरू नये, अशी संघटनेची मागणी आहे. शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या २४ जून २० च्या परिपत्रकान्वये महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार असलेले, रक्तदाब, हृदयविकार इत्यादीसारखे गंभीर आजार असलेले व ५५ वर्षांच्या वरील शिक्षकांना शाळेमध्ये न बोलवता त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याच्या कालावधीपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वर्क फ्रॉम होम सुविधा देण्यात आली होती. तसेच याच शासन परिपत्रकांमध्ये शिक्षकांना शक्यतो आठवड्यामध्ये एक किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त वेळा बोलावू नये जेणेकरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावू नये, असेसुद्धा स्पष्ट केलेले आहे. तसेच उपस्थितीबाबत इतरही शासन निर्णय आहेत. त्यामुळे वरील बाबी पाहता शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमित उपस्थितीचा आग्रह धरू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनावर संतोष राजगुरु, योगेश झांबरे, रमेश फटाले, बी. आर, काळे, अमोल तोडे, फेरोज बेग, राजेंद लबासे आदींची नावे आहेत.
प्रतिक्रिया
कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत नियमित उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाचे विविध आदेश व कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शिक्षकांना वर्क फ्रॅम होम, ऑनलाईन शिक्षण, ५० टक्के उपस्थिती, महिला शिक्षिकांना उपस्थितीत सूट द्यावी.
संतोष राजगुरू
संपर्कप्रमुख प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना.