लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : थर्टी फर्स्ट च्या दिवशी टेंभुर्णी पोलीसांनी दारू व जुगाराविरोधात केलेल्या एकाकडून हजारो रूपयांचा माल जप्त केला आहे.याबाबत माहिती अशी की अकोलादेव परिसरात देशी दारूची अवैध विक्री होत असल्याची माहीती सोमवारी टेंभुर्णी पोलिसांना मिळाली. त्यानुसार अकोला तांडा येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी देशी दारूच्या २ हजार ४०० रू. किंमतीच्या ३० बाटल्या जप्त केल्या. यात दारू विक्रेता फरार झाला असून त्याच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याच दिवशी दुसरया एक अन्य कारवाईत टेंभुर्णी परिसरात एका जुगार अड्ड््यावर छापा टाकून पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सहा जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएस आय पंकज मोरे, सहायक फौजदार अशोक जाधव, पो.नाईक गवळी, नवनाथ राऊत, दिनेश चंदनशिवे, छाया निकम आदींनी कारवाई केली.
टेंभुर्णी पोलिसांची दारू व जुगाराविरोधात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:30 AM