शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
5
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
7
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
9
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
10
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
11
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
12
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
14
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
16
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
18
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
20
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

वर्दीचा ‘तिहेरी’ दणका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:32 AM

डॉक्टराच्या प्रिप्क्रीप्शनशिवाय गर्भपात व कामवासना उत्तेजनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची बेकायदेशीररित्या विक्री करणा-या एका इसमास अन्न आणि औषधी प्रशासन विभाग आणि सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले

बेकायदेशीररीत्या गर्भपाताची औषधी विक्री करणारा अटकेतलोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉक्टराच्या प्रिप्क्रीप्शनशिवाय गर्भपात व कामवासना उत्तेजनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची बेकायदेशीररित्या विक्री करणा-या एका इसमास अन्न आणि औषधी प्रशासन विभाग आणि सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले आहे. ज्ञानदेव नारायण सातपुते (रा. रेवगाव ) आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीची औषधी जप्त करण्यात आली आहेत.जालना शहराजवळ असलेल्या रेवगाव येथील ज्ञानदेव नारायण सातपुते हा इसम गेल्या काही दिवसापासून डॉक्टराच्या प्रिप्क्रीप्शनशिवाय गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणा-या औषधासह कामवासना उत्तेजित करणारी औषधी विक्री करत असल्याची माहिती अन्न-औषधी प्रशासन विभाग आणि सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनी नवीन जालन्यातील शिवाजी पुतळा भागात बुधवारी सायंकाळी सापळा रचला. एक बनावट ग्राहक तयार करून त्याला ज्ञानदेव सातपुते यास फोन करण्यास सांगून आपणास औषधी आवश्यक असुन शिवाजी पुतळ््यावर येण्यास सांगितले. यावेळी सातपुते हा काही वेळेतच शिवाजी पुतळा भागात सदर औषधी घेऊन आला. याचवेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० हजार रुपयांची औषधी जप्त करण्यात आली. याप्रकरणी औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांच्या फियार्दीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस नाईक बोंद्रे, पोकॉ. भुतेकर, मनोज काळे, खार्डे, वसंत धस, पवार यांनी कामगिरी केली आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या निरीक्षक अंजली मिटकर, आर. डी. कुलकर्णी, नाडे हे या कारवाईत सहभागी झाले होते.केक कापण्यासाठी तलवार घेऊन जाणारे दोघे अटकेतजालना : वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार घेऊन जाणाºया दोघास सदर बाजार पोलिसांनी जालना शहरातील खांडसरी येथून ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक तलवार जप्त करण्यात आली. राहुल धर्मा सुतार (वय २५, रा. हनुमानघाट), संतोष शंकर जाधव (रा. हनुमानघाट) अशी आरोपींची नावे आहेत.जालना शहरातील खांडसरी परिसरात पोलिस मंगळवारी रात्री पेट्रोलिंग करत असतांना एक इसम हातात तलवार घेऊन घाई-गडबडीने जातांना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, मित्राच्या वाढदिवस असल्याने केक कापण्यासाठी ही तलवार घेऊन जात असल्याचे सांगितले. सदर तलवार आपण संतोष शंकर जाधव याच्याकडून आणल्याची कबूली दिली.याप्रकरणी पोकॉ. स्वप्नील साठेवाड यांच्या फियार्दीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस कर्मचारी स्वप्नील रमेश साठेवाड, योगेश पठाडे यांनी केली.आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यातलोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोणत्याही तांत्रिक अभ्यासक्रमाचे (ट्रेड) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण न घेता थेट राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण परिषदेचे बनावट प्रमाणपत्र तयार करून विकणा-या दोघांना बदनापूर येथून ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सांयकाळी केली. फोटो स्टुडिओ चालक भगवान साहेबराव खांडेभराड (४८, रा. चिकनगाव ता. अंबड ह.मु. धोपटेश्वर ता. बदनापूर) व संतोष ज्ञानदेव मनभरे (३१, रा. धोपटेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत.बदनापूर येथील एका फोटो स्टुडिओमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन त्याची विक्री होत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री बदनापूर येथील गुरुकृपा फोटो स्टुडिओमध्ये बनावट ग्राहक पाठवून प्रमाणपत्र तयार करुन घेतले. व त्यानंतर सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीच्या ताब्यातील काही बनावट प्रमाणपत्रासह संगणक, प्रिंटर्स, स्कँनर्स जप्त करण्यात आले असून, संगणकातून अनेकांना प्रमाणपत्र दिल्याचे समजते. आरोपीविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना ७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, पोहवा. संतोष सावंत, पोना. फुलसिंग घुसिंगे, फुलचंद हजारे, समाधान तेलंग्रे, सदाशिव राठोड, रवी जाधव यांनी यशस्वी केल्याचे गौर यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक