शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केली होती मात
2
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
3
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
4
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
5
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
6
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
7
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
8
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
9
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
10
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
11
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
12
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
13
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
14
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
15
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
16
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
17
पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी फरार, संतप्त जमावाकडून तोडफोड
18
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
19
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
20
तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत

ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 6:25 PM

Hikmat Udhan Vidhan Sabha 2024: विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल अशी स्थिती असून, जालना जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: शिवसेनेतील फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या हिकमत उढाण यांनी सोमवारी (१४ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत हिकमत उढाण हे सह-संपर्कप्रमुख होते. ठाकरेंचे शिवबंधन तोडत त्यांनी विधानसभा निवडमुकीच्या तोंडावर शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांची चिंता वाढली आहे. कारण उढाण हे टोपेंचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. 

राजेश टोपे विरुद्ध हिकमत उढाण?

विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात इच्छुक अंदाज घेऊन पक्ष बदलताना दिसत आहे. हिकमत उढाण यांनीही आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या हिशोबाने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. 

२०१९ मध्ये हिकमत उढाण यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या हिकमत उढाण यांचा फार कमी मतांनी पराभव झाला होता. यावेळीही ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, पण राजेश टोपे विद्यमान आमदार असल्याने ही जागा शरद पवारांकडे जाणार हे निश्चित आहे.

हिकमत उढाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हिकमत उढाण घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरल्यास राजेश टोपे यांना निवडणूक जड जाऊ शकते. कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांचा अवघ्या तीन हजार मतांनी विजय झाला होता. 

राजेश टोपे यांना १,०७,८४९ मते मिळाली होती. तर शिवसेनेचे हिकमत उढाण यांना १,०४,४४० मते मिळाली होती. ३,४०९ मतांनी हिकमत उढाण यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विष्णू शेळके यांना ९,२९३ मते मिळाली होती. 

गोळी थेट डोक्यात लागणार; हिकमत उढाण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा उल्लेख न करता हिकमत उढाण यांनी यावेळी विजय मिळवणारच, असे संकेत दिले. पक्षप्रवेशावेळी ते म्हणाले, "मला आज खूप बोलायचं होतं, पण साहेबांनी मला पाच मिनिटांचा वेळ दिला होता. २०१९ मध्ये गोळी कानावरून गेली. यावेळी आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना शब्द देतो... यावेळी गोळी कानावरून जाणार नाही, तर गोळी थेट डोक्यात घुसेल. शेवटी एकच सांगतो की, जखमी हुआ तो क्या हुआ, टायगर अभी जिंदा है", असा इशारा हिकमत उढाण यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना पक्षप्रवेशावेळी दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकghansawangi-acघनसावंगीRajesh Topeराजेश टोपेUddhav Thackerayउद्धव ठाकरे