Eknath Shinde - Manoj Jarange Patil, Maratha Reservation : गेल्या 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचे उपोषण होते. जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपासून पाणी घेणं देखील बंद केलं होते. पण आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आश्वासनानंतर अखेर १७व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेतले. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे, राजेश टोपे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांचीदेखील उपस्थिती होती. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतर जरांगे पाटील यांच्या वडिलांनाही ज्यूस पाजला.
----
सविस्तर वृत्त लवकरच