जालना : उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या एका कुटुंबाने चक्क दरवाजा उघडा ठेवून कुलर लावून झोप खाल्ली. परंतु, चोरट्यांनी हीच संधी साधून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ९ लाख ७० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी पहाटे राणीउंचेगाव (ता.घनसावंगी) येथे घडली.
राणीउंचेगाव येथील काशिनाथनगर भागात राहणारे गणेश रोहिदास राठोड हे गुरूवारी रात्री कुटुंबासमवेत घरी झोपले होते. रात्री उकाडा अधिक असल्याने कुलर लावून त्यांनी दरवाजा उघडा ठेवला होता. हीच संधी साधत चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास राठोड यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले दागिने, रोख रक्कम लंपास केली. तसेच अशोक राठोड यांचे घर फोडून आतील रोकड, दागिने असा एकूण ९ लाख ७० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणात गणेश राठोड यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. स्कॉट हे करीत आहेत.