जालना : अचानक झोप लागल्याने भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर आदळल्याची घटना मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावरील कॉरिडॉर ३८७ वर गुरूवारी सकाळी घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
अमरावती येथील अमित खंडेलवाल आणि अनिता खंडेलवाल हे दोघे कार क्रमांक (एमएच.२०.ईजे.९१४१)ने अमरावती येथून छत्रपती संभाजीनगरकडे गुरूवारी सकाळी जात होते. जालना जिल्ह्याच्या हद्दीत आल्यावर चालक अमित खंडेलवाल यांना अचानक झोप लागली. झोप लागल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. कार दुभाजकावर जाऊन आदळली. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झाली नाही.
याची माहिती महामार्ग पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच, आरटीओचे राजपूत, महामार्गाचे कर्मचारी राठोड, ठोंबरे, दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही बाहेर काढण्यात आले. त्यांना कुठलीही जखम झाली नव्हती.