शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

चूल पेटली; पण जेवण जाईना, सरकार लवकर निर्णय घ्या...; ग्रामस्थ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 12:00 PM

‘व्हीआयपीं’च्या गर्दीने दमछाक

- पवनराजे पवार वडीगोद्री (जि. जालना) : मंत्री येताहेत, खासदार येताहेत अधिकारीही येताहेत. ‘व्हीआयपीं’च्या गर्दीने ग्रामस्थांचीच नव्हे प्रशासनाचीही दमछाक होतेय. उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची काळजी वेगळीच आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाटतेय. गावातील चूल पेटली आहे; पण जेवण जाईना, सरकार काही लवकर निर्णय घेईना, अशा हताश प्रतिक्रिया अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथील उपोषणकर्ते, ग्रामस्थांनी व्यक्त केली.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सहाव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या लाठी हल्ल्यानंतर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासूनच अंतरवाली सराटी गावात विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी येत होते. जरांगे यांच्यासह जखमी झालेले नागरिक, महिलांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली जात होती. दिवसभर मंत्री, नेतेमंडळी, विरोधी पक्षाचे नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांची गावात हजेरी सुरू होती. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते. गावात भीतीचे वातावरण  लाठीहल्ला, वाढलेले व्हीआयपींचे दौरे आणि त्यांच्यासोबत असणारा पोलिसांचा फौजफाटा यांमुळे ग्रामस्थांमध्ये आजही भीतीचे वातावरण आहे. 

आज अतिरिक्त पोलिस महासंचालक चौकशीसाठी येणारलाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना हे सोमवारी जालना शहरात येणार आहे. अंतरवाली सराटी गावाला भेट देऊन ते सर्व बाजूंची चौकशी करून अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देणार आहेत. चौकशीसाठी आमच्याकडून पूर्णपणे मदत केली जाईल, अशी माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

कोटगावात आज शांतता आहे. आम्हाला आरक्षणाचा फायदा होईल माहिती नाही; परंतु, आमच्या पुढील पिढीला नक्की होईल. शासनाने योग्य निर्णय दोन दिवसांत घ्यावा. - नंदकुमार तारख, ज्येष्ठ नागरिक 

आरक्षण शांततेत सुरू असताना पोलिसांनी अचानक लाठीहल्ला, गोळीबार केला आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. माझी सून, मुलगा गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत. - अलकनंदा तारख,  ज्येष्ठ महिला 

आमच्या बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावेत. पोलिसांनी आमच्यावर जो लाठीचार्ज व गोळीबार केला, यात अनेकजण जखमी झाले आहेत. ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्यांना बडतर्फ करावे आणि तातडीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात.- आनंद तारख, तरुण

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाJalanaजालना