लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावात बुधवारी रात्री तिरुपती कॉम्प्लेक्स मधील मोबाइल शॉपी व पोस्ट आॅफीसचे शटर लोखंडी टांबीच्या साह्याने उचकटून पोस्ट आॅफीसमध्ये प्रवेश केला. तेथे काहीही न मिळाल्याने शेजारच्या नाथ मोबाईल शाँपीचे शटर वाकवून दुकानातील ४ हजार रुपये रोख लंपास केले. हा सगळा प्रकार बाजूला असलेला मल्टीस्टेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.याबाबत भागवत कंटुले यांनी पोलिसांत तक्रार असून, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात चो-या वाढल्या असून, चोरट्यांचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश पाटोळे हे करत आहेत. परिसरात वाढत्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र चोरीचा छळा लावण्यात पोलिसांना यश येत नसल्याने ग्रामस्थ, दुकानदारांत संताप आहे. रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.पोस्ट आॅफिसमधील शेटर उचकटताना बाजूला असलेल्या एका मल्टीस्टेट बँकेतच्या सीसीटीव्हीमध्ये दोन चोरटे कैद झाले आहेत. रात्री साडे बारा ते अडीच या वेळेत त्यांनी पोस्ट आॅफिस व मोबाईल शॉपीचे शटर उचकटून आत प्रवेश केल्याचे दिसत आहे. परंतु काही हाती लागले नाही.
कुंभार पिंपळगावात दोन ठिकाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:01 AM