शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

कोई नही आनेवाला बचाने को,हम पचास लोग है; कान, नाक कापून दागिने काढणारे दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 6:03 PM

दोन दिवसांपूर्वी तीर्थपुरी येथे नागरिकांना मारहाण करून दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला होता.

- दीपक ढोलेजालना : कोई नही आनेवाला आपको बचाने को.... हम ५० लोग है, असे म्हणत दरोडेखोर नागरिकांना धमकवायचे. त्यानंतर क्रूरतेने काना, नाकावर चाकूने वार करून दागिने काढायचे. राॅड टाकून हातातील दागिने काढणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना एलसीबीच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतले. गंगाराम व्यंकटी शिंदे (रा. पिठोरी सिरसगाव) व बाबुशा सावळा पवार (रा. गोंदी तांडा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. अन्य चार जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी तीर्थपुरी येथे नागरिकांना मारहाण करून दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा गुन्हा पिठोरी सिरसगाव येथील गंगाराम शिंदे, बाबुशा पवार यांनी साथीदारांसह केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. घनसावंगी तालुक्यातील पिठोरी सिरसगाव व परिसरातील सहा दरोडेखोरांची ही टोळी आहे. त्यांच्यावर जिल्ह्यासह राज्यभरात दरोड्याचे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. दरोडा टाकण्यासाठी ते संबंधित घराची पूर्ण माहिती काढून घेत असे. त्यानंतर वेगवेगळे बहाणे करून त्या घरी जाऊन पाहणी करायचे. नंतर मध्यरात्री दगड, कोयता, कुऱ्हाड, चाकू घेऊन दरोडा टाकायचे. घरात कोणी असल्यास त्यांना कोई नही आनेवाला बचाने को... हम ५० लोग है असे म्हणत धमकावयाचे.

कानावर, नाकावर चाकूने वार करून दागिने काढायचे. नंतर हातातील दागिनेही रॉडच्या साह्याने काढायचे. त्यांनी जाफराबाद व खडका येथेही अशाच प्रकारे दरोडा टाकला आहे. हिंदीतील वाक्यावरूनच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला क्लू मिळाला, त्यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि. प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, जगदीश बावणे, रंजित वैराळ, रूस्तुम जैवाळ, विनोद गडदे, सचिन चौधरी, सागर बावीस्कर, दत्तात्रय वाघुंडे, कृष्णा तंगे, सुधीर वाघमारे, देवीदास भोजने, भागवत खरात, किशोर पुंगळे, कैलास चेके, योगेश सहाने, शडमल्लू , रमेश पैठणे आदींनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस