शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

कोर्टात उडाला गोंधळ; फिर्यादीने भर कोर्टात न्यायाधीशांसमोर कीटकनाशक केले प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 6:58 PM

प्रकरण मिटविण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप

- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना) : साक्ष देण्यासाठी आलेल्या फिर्यादीने न्यायाधीशासमोरच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी येथील न्यायालयात घडली. राजू माणिकराव मिसाळ फिर्यादीचे नाव असून त्याच्यावर जालना येथे उपचार सुरु आहेत.

या बाबतची माहिती अशी की, तालुक्यातील जानेफळ मिसाळ येथील राजू माणिकराव मिसाळ यांना त्यांच्याच भावकितील शहादेव मिसाळ व इतर चार जणांनी सन 2020 मध्ये बेदम मारहाण केली होती. त्यावेळी राजू मिसाळ यांच्या तक्रारीवरून पाच जणांच्या विरुध्द हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. भोकरदन न्यायालयात सदर प्रकरण सुरू होते. 

मात्र, काही दिवसांपूर्वी भावकीतील काही लोकांनी गावात बैठक घेऊन प्रकरण तडजोड करून आपसात मिटविण्याचे ठरवले. यानुसार राजू यांनी न्यायालयात साक्ष देऊन प्रकरण मिटविण्याचे सांगण्यात आले. यानुसार, आज राजू मिसाळ व इतर सर्व न्यायालयात आले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश रोहिणी पाटील यांच्यासमोर साक्ष देण्यासाठी राजू मिसाळ उभे राहिले. यावेळी मला मारणारे मोकळे फिरत आहेत, माझ्यावर प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आहे.  खोटी साक्ष दयावी यासाठी दबाव येत असल्याने मला जिवंत राहण्याची इच्छा नाही, असे म्हणून जवळ राजू यांनी बॉटलकाढून कीटकनाशक प्राशन केले. उपस्थितांनी राजूकडून बॉटल खाली पाडली. यामुळे न्यायालयात एकच गोंधळ उडाला. 

दरम्यान, सपोनि बालाजी वैद्य, कर्मचारी के. बी. दाभाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राजू मिसाळ यास भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचार करून त्यास अधिक उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाCourtन्यायालय