शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही...'; मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 7:59 AM

मनोज जरांगे पाटील यांची ‘लोकमत’ने घेतलेली एक्स्क्ल्युझिव मुलाखत.. 

- राम शिनगारे

अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) : मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावात २८ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी उपोषणस्थळी केलेला गोळीबार व लाठीहल्ल्यामुळे आंदोलन चर्चेत आले आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची ‘लोकमत’ने घेतलेली एक्स्क्ल्युझिव मुलाखत.. 

प्रश्न :  पोलिसांनी गोळीबार केलाय का? उत्तर : ही बघा गोळी. (जवळील रिकामी बुलेट दाखवतात). आमच्याकडे काही बुलेटचा कारखाना नाही ?

प्रश्न :  आंदोलन किती दिवस चालणार? उत्तर : आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही. काल त्यांनी गोळीबार केला. आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही. 

प्रश्न    प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन कशासाठी? उत्तर : आम्ही न्यायप्रविष्ट आरक्षणाचा विषय घेतलेलाच नाही. मराठवाड्यातल्या मराठ्यांना पूर्वी आरक्षण होतं, ते आरक्षण द्या, असं आम्ही म्हणतोय. जर हे न्यायप्रविष्ट असतं तर मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी समिती कशाला गठित केली? विदर्भाच्या अगोदर हैदराबाद संस्थानात होतं ते आरक्षण द्या, असं आमचं म्हणणं आहे.

प्रश्न   मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतरही आंदोलन सुरू का ठेवलं? उत्तर : त्यांनी फोन केला, की आता आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. मी आरक्षण देतो. त्यावर मी म्हणालो, साहेब तुमच्या समितीनं अहवालच दिलेला नाही. त्यावर असं असेल तर मी आत्ताच्या आत्ता समितीला बोलावतो आणि तुम्ही अहवाल केलाय का ते विचारतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुन्हा फोन करतो म्हणाले, एका तासात केला नाही आणि आता आमच्यावर थेट हल्लाच झाला.

प्रश्न  पोलिस म्हणतात, तुमची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात नेणं गरजेचं होतं? उत्तर : आता काल तब्येत खालावली म्हटल्यावर मी आज तर बोलतोय. मी जर बोलू शकतो, तर तब्येत खालावली कोणाची? तरी मी एसपींना सांगितलं, की तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची ती करा. तयार झाले, त्यांनी डॉक्टर आणले, माझ्या सगळ्या तपासण्याही केल्या. तब्येत चांगली राहण्यासाठी मला पाणीही प्यायला लावलं. तुम्ही उपचार घेतले, आम्ही खूश झालो आणि चाललो, असं म्हणाले. दोनशे मीटरवर गेले आणि एकाएकी ५०० पोलिसांचा ताफा आला आणि लोकांना मारायला लागला, याचं काय कारण?

प्रश्न   आंदोलन चिघळलं कसं?उत्तर : हे आंदोलन लाठीचार्जमुळे राज्य सरकारनं चिघळवलं. सरकारला मराठ्यांना काहीच द्यायचं नाही. म्हणून यांनी जाणूनबुजून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :JalanaजालनाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार