जालना : भरदिवसा १४ लाख ७० हजार रूपये असलेली बॅग हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांना सीसीटीव्हीच्या मदतीने स्थानिक गुन्हेे शाखेच्या पथकाने २४ तासांत जेरबंद केले आहे. सुदाम विक्रम जाधव (२४ रा. सुलतानपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर), विठ्ठल भिमराव अंभोरे (२३ रा. सुंदरनगर, जालना) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १५ लाख ९७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी जालना शहरातील एमआयडीसी परिसरात योगेश राजेंद्र मालोदे यांच्या हातातून १४ लाख ७० हजार रूपये असलेली बॅग चोरट्यांनी हिसकावून नेली होती. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना, पोलिसांनी घटनास्थळासह जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवरील सीसीटीव्ही बघून माग काढला. अहमदनगर जिल्ह्यातील सुलतानपूर येथे पोहोचले. यावेळी संशयित सुदाम जाधव याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने संशयित विठ्ठल अंभोरे याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रक्कम जप्त केली आहे.
शिवाय, काही दिवसांपूर्वीच चंदनझिरा हद्दीतच बॅग पळविल्याची कबुली दिली. त्यांंच्याकडून १३ लाख ३० हजार व अन्य एका गुन्ह्यातील १ लाख २५ हजार, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चार मोबाईल असा एकूण १५ लाख ९७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळ कायटे, राम पव्हरे, भाऊराव गायके, फुलचंद हजारे, विनोंद गडधे, रमेश राठोड, जगदीश बावणे, रूस्तुम जैवाळ, कृष्णा तंगे, दत्ता वाघुंडे, सागर बावीस्कर, लक्ष्मीकांत आडेप, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, विजय डिक्कर, संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, फुलचंद गव्हाणे, कैलास खार्डे, दीपक घुगे, देविदास भोजने, सुधीर वाघमारे, सतीश श्रीवास, इरशाद पटेल, किशोर पुंगळे, अक्रुर धांडगे, सचिन राऊत, कैलास चेके, योगेश सहाणे, धीरज भोसले, रवी जाधव, भागवत खरात, संजय सोनवणे, धम्मपाल सुरडकर, सौरभ मुळे यांनी केली आहे.