एकीकडे कोरोनाची रूग्ण संख्या वाढत असली तरी दुसरीकडे कोरोनचे लसीकरणही जोमात सुरू आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांच्यासह आता ज्येष्ठ नागरिक, विविध आजार असलेल्या ज्येष्ठांनाही कोरोनाची लस दिली जात आहे. ज्येष्ठांच्या लसीकरण मोहिमेत प्ररंभी दोन दिवस तांत्रिक समस्यांनी कहर केल्यामुळे लसीकरणाला गती मिळाली नव्हती. परंतु, तिसऱ्या दिवशी बुधवारी जिल्हाभरात कोरोना लसीकरणाला काहीसी गती मिळाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात ८७० जणांना कोरोनाची लस देण्यात आली. यात आरोग्य विभागातील ८९ जणांना पहिला डोस तर १५५ जणांना दुसरा डोस देण्यात आला. फ्रंटलाईन वर्करमध्ये ८० जणांना पहिला डोस तर २९ जणांना दुसरा डोस देण्यात आला. विविध आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील १३६ जणांनी कोरोनाची लस घेतली. तर ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ३८१ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. दिवसभरात ६८६ जणांना पहिला डोस तर १८४ जणांना कोरोनाचा दुसरा डोस असे एकूण ८७० जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या कोरोना लसीकरण मोहिमेला आणखी गती देण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. विशेषत: ऑनलाईन नोंदणीवेळी येणाऱ्या तांत्रिक समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे.
केंद्रावर झालेले लसीकरण
केंद्र विविध आजार असलेले ६० वर्षांवरील
जिल्हा रुग्णालय- ४३ - ७८
अंबड- ०१- ३०
बदनापूर - ०० - ०९
भोकरदन- ००- ०६
घनसावंगी- ०३- ०३
जाफराबाद- ००-२५
मंठा- ०१- १०
परतूर- ०७- २४
दीपक हॉस्पिटल- ३९- ६०
गणपती नेत्रालय- ०६- ७४
मिशन हॉस्पिटल- ३६- ६२
एकूण- १३६- ३८१