लोकमत न्यूज नेटवर्कजालना : किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना दर तिसऱ्या दिवशी डायलेसीस करावे लागते. हा खर्च मोठा असतो. तो गरीब रुग्णांना येऊ नये म्हणून लायन्स क्लब जीपीआर आणि ओम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे तिस-या मशीनचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले.आतापर्यंत दोन मशीनवर ९० रुग्णांना या सुविधेचा लाभ देण्यात आल्याची माहिती डॉ. रितेश अग्रवाल यांनी दिली. गुरुवारी लायन्स क्लबचे पदाधिकारी मुरारीलाल गुप्ता, विजयकुमार कागलीवाल, प्रकाश लड्डा, शरद जैस्वाल, राजेश कामड, किशोर गुप्ता, रामनिवास गर्ग, ध्रुवकुमार पित्ती, ध्रुवकुमार कामड, अशोक हुरगट, कमलकिशोर झुनझुनवाला, गोयल आदींची यावेळी उपस्थिती होती.जर्मनी येथून ही मशीन मागविण्यात आली असून, लायन्स क्लबने यासाठी मदत केली आहे. ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने रुग्णांना सुविधा देण्याची तयारी दर्शविल्याने त्यांचे लायन्स परिवाराने आभार मानले आहे.
लायन्स जीपीआरतर्फे तिसरे डायलेसीस मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 12:47 AM