जालना : महापुरुषांचे विचार हे भावी पिढीला प्रेरणादायी असतात. महापुरुष हे कोणत्याही जातीधर्माचे नसतात, असे प्रतिपादन डॉ. विजय कुमठेकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे चरित्र साधन समितीवर सदस्य म्हणून डॉ. विजय कुमठेकर यांची निवड झाल्याबद्दल जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
प्राध्यापक डॉ. अनिरुद्ध उढाण यांना स्वामी रामानंद विद्यापीठ नांदेडकडून उच्चविद्याविभूषित विद्यावाचस्पती ही पदवी बहाल करण्यात आली आहे. यावेळी उपप्राचार्य प्रा. रमेश भुतेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ना. राजेश टोपे, सचिव मनीषा टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ.बी.आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड यांनी कौतुक केले.
यावेळी डॉ. संभाजी पाटील, डॉ. रामदास वैद्य, डॉ. राम रौनेकर, डॉ. पंडित रानमाळ, डॉ. मधुकर गरड, डॉ. भुजंग डावकर, डॉ. संजय शेळके, डॉ. सुरेश गरुड, डॉ. सुदर्शन तारख, प्रा. पांडुरंग खोजे, प्रा. दादासाहेब शिंदे, प्रा. दत्ता पटाईत, प्रा. शौकत शेख, प्रा. वशिम तांबोळी, प्रा. प्रदीप लेकुरवाळे, प्रा. बाळासाहेब पवार, प्रा. बाळासाहेब लुंगाडे, डॉ. गणेश भुतेकर, डॉ. सुरेंद्र पडगिलवार, प्रा. शुभांगी राऊत, प्रा.वैशाली मगरे, प्रा. शोभना भालेराव, श्रीधर गाढे, महेश वाघमारे, रघुनाथ शिंदे आदींची उपस्थिती होती.