लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या मराठवाड्यात पावसाने हुलकावणी दिली आहे, असे असले तरी परतीचा पाऊस पडेल अशी ओढ मनात ठेवून, राजूरेश्वरला पावसाचे साकडे घालण्यासाठी आम्ही जात असल्याचे वारकऱ्यांच्या एका जथ्थ्याने सांगितले. हा भाविकांचा जथ्था परभणी जिल्ह्यातून राजूरच्या दर्शनासाठी जालन्यातून पायवारीव्दारे जात होता. मंगळवारी अंगारिका चतुर्थी असल्याने राजूरेश्वराच्या दर्शनाला मोठे महत्व भाविकांमध्ये फार पूर्वीपासून आहे. आपल्या दैवताच्या दर्शनासाठी हजारो भाविक हे जालन्यातून पायीवारी करतात. तसेच भोकरदन आणि अन्य शहरातूनही अनेकजण पायी जातात.राजूरेश्वराचे महत्व हे पौराणिक कथांमध्ये विशद केलेले आहे. गणपतीच्या शक्तीपीठांपैकी राजूरेश्वरला नाभिचे स्थान मानले जाते. या गणपतीचे ऐतिहासिक पौराणिक महत्व सर्वजण जाणून असल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणूनही याची ओळख संर्पूण महाराष्ट्रभर आहे. अंगारिका चतुर्थीला राजूरेश्वराच्या दर्शनाला येणाºया भाविकांची लाखोतील संख्या लक्षात घेऊन प्रशासनो आवश्यक ती तयारी केली आहे. मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात.दर्शनासाठी पायी जाणा-या भाविकांची हजारोंची संख्या लक्षात घेऊन वाहतूकीतही मोठे बदल केले असून, पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. राजूर मंदिर परिसरात दर्शन शांततेत व्हावे म्हणून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्हीची नजरही या सर्व यात्रेवर राहणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.पंढरपूरच्या यात्रेत ज्या प्रमाणे रांगेतील वारकाऱ्यांमधून एका जोडप्याला विठ्ठलाच्या पूजेचा सन्मान मिळतो. तशीच पद्धत राजूरमध्येही गेल्या काही वर्षात सुरू करण्यात आली आहे. त्याामुळे आपल्याला हा सन्मान मिळावा म्हणून अनेकजण रात्री नऊ वाजेपासूनच रांगेत दर्शनासाठी उभे राहतात असे सांगण्यात आले.या पायी जाणा-या भाविकांना विविध संस्थां, संघटनांकडून जागोजागी चहापान तसेच फराळाची व्यवस्था केली आहे.अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्थाही अनेक ठिकाणी करण्यात आली आहे.
राजुरेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची पायी वारी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:54 AM