शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

५३ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:27 AM

पाण्याअभावी ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीही धोक्यात आली आहे.

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यासाठी वरदान ठरलेला निम्न दुधना प्रकल्प पावसाअभावी कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. प्रकल्पात अल्पसा पाणीसाठा असून, परतूर, सेलू, मंठा शहरासह ग्रामीण भागातील पाणी प्रश्न बिकट बनला आहे, तर पाण्याअभावी या प्रकल्पावर आधारित असलेल्या ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीही धोक्यात आली आहे.मागील वर्षी तालुक्यात आजपर्यंत ४७२. ६० मी.मी. पाऊस झाला होता. तर यंदा आजवर केवळ २७१. ८९ मी.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच केवळ ३७.७६ टक्के पाऊस अद्याप झालेला आहे. हा पाऊस ही भिज पावसाप्रमाणे झाला. त्यामुळे नदी, नाले, तलाव, धरण यांसह इतर जलस्त्रोत कोरडे ठाक आहेत.तालुक्यासह परिसराला वरदान ठरलेला निम्न दुधना प्रकल्पही कोरडाच आहे. यंदा एकही थेंब या धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली नाही. उलट उपलब्ध असलेला मृत साठा दिवसेंदिवस घटत आहे. या धरणात असलेले पाणी उन्हाळ््यामध्ये परभणीसाठी सोडण्यात आले होते. यामुळे धरण रिकामे झाले. सद्यस्थितीत धरणात जिवंत पाणी साठा उणे -१९. ७१ दलघमी असून मृतसाठा ५४.५४६ दलघमी आहे. या धरणाच्या पाण्यावर जवळपास ५५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. हे सिंचन क्षेत्रही आता धरणात पाणी नसल्याने अडचणीत आले आहे. याबरोबरच या धरणाच्या पाण्यावर परतूर, सेलू, मंठा, डासाळासह इतर गावच्या पाणी पुरवठा योजना सध्या पाण्यासाठी झुंज देत आहेत. धरणाची पाणी पातळी घटल्याने बॅक वॉटरही खाली गेले आहे. यामुळे पाणी पुरवठा योजना पंप, पाईप टाकून पाणी ओढत आहेत. पाणीही गाळ युक्त असल्याने नागरीकांना मिळणारे पाणी अस्वच्छ मिळत आहे. धरणातील हा मृत साठा किती दिवस पुरणार ? हा प्रश्न आहे. बॅक वॉटर खाली गेल्याने दुधना नदीचे पात्र कोरडे पडले आहे. दरवर्षी या दिवसात बॅक वॉटरने डबडबलेल्या दुधना नदीच्या पात्रात यंदा मात्र गवत उगवले आहे.४निम्न दुधनाच्या बॅक वॉटर वर परतूर तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून दुधनावरून पाईपलाईन करून सिंचनाची सोय केली. मात्र, यंदा दुधना नदीच्या पात्रात पाण्याचा थेंबही नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळDamधरणagricultureशेतीwater shortageपाणीकपात