लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाभरात साथ रोगाने थैमान घातले असल्याने नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. जिल्ह्यात २३ हजार रुग्ण तापाने फणफणले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी गावंडे यांनी दिली. तसेच ३ रुग्णांना मलेरिया तर ८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.सध्या पावसाळ््याचे दिवस सुरु आहे. पावसाळ््यात पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. डासांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक आजारी पडत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे.खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी दिसत आहे. सर्दी, खोकला, हातपाय दुखणे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. विशेषत: ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ हजार १७ नागरिक तापाने फणफणले आहे. तर आॅगस्ट महिन्यात २७ हजार ६९६ रुग्णांना ताप असल्याचे सांगण्यात आले. या सर्व रुग्णांचे रक्त जल नमुने तपासण्यात आले. यातील ३ जणांना मलेरिया तर ११ रुग्णांना डेंग्यू झाल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिली.प्रशासनाने गावात स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश दिले असतानाही ग्रामपंचायत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावातील नाल्या व डबक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात आजाराचे प्रमाण वाढले आहे.
२३ हजार जण तापाने फणफणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:09 AM