शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

हजारो विद्यार्थ्यांनी घेतला एअरो मॉडेलिंगचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:43 AM

रोटरी क्लब आॅफ जालन्याच्या वतीने आयोजित रोटरी जालना एक्स्पोमध्ये शनिवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी एअरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते.

जालना: रोटरी क्लब आॅफ जालन्याच्या वतीने आयोजित रोटरी जालना एक्स्पोमध्ये शनिवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी एअरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एअरो मॉडेलिंगच्या प्रात्यक्षिकांचा आनंद लुटला.पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी आ.राजेश टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मनीषा टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या शोव्दारे प्रोत्साहन घेऊन तरुणांनी वैमानिक होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन लोणीकर यांनी या वेळी केले. लहान विमान, मोठे विमान कशीे उडतात, संरक्षण दलात विमानाचे महत्त्व, ड्रोनची कार्यपदध्ती याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शोमध्ये लहान-मोठी १५ विमाने उडविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. जिज्ञासू विद्यार्थ्यांनी सदानंद काळे आणि कॅप्टन बाळू जहागीरदार यांना प्रश्न विचारले. विमानाची कार्यपद्धती याबद्दलही माहिती देण्यात आली. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अकलांक मिश्रीकोटकर, सचिव डॉ. दीपक बगडिया, सुनील रायठठ्ठा, उद्योजक किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, अभय करवा, सुरेंद्र मुनोत, स्वप्नील बडजाते, अनिल छाबडा, प्रीतम लोणगावकर, संदीप तोतला, जिग्नेश शाह, भावेश पटेल, राजेंद्र भारुका, जगदीश राठी, जितेंद्र पित्ती, हेमंत ठक्कर, अभय करवा, राजेश श्रीवास्तव, समीर अग्रवाल, लता चन्ना, किशोर पंजाबी, अरुण अग्रवाल, राजेश सोनी, अभय नानावटी, महेंद्र बागडी, प्रमोद झांझरी, राहुल मिश्रीकोटकर आदींची उपस्थिती होती.--------एक्स्पोचा उपक्रम कौतुकास्पदरोटरी जालना एक्स्पोला पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भेट देऊन या एक्स्पोचे कौतुक केले. एक्स्पोमधील विविध स्टॉल्सना भेटी देऊन त्या-त्या उत्पादनांचीही लोणीकर यांनी माहिती घेतली. या एक्स्पोमध्ये जिशन इन्फ्राबिल्डने लोखंडी शेडपासून तयार केलेले शौचालय, स्वच्छ भारत मिशनचा स्वच्छतेचा संदेश देणारा स्टॉल, स्वच्छ भारत अभियानाची माहिती असलेला लायन्स क्लब आॅफ परतूरचा स्टॉल, पतंजली योग समिती जालनाचा स्टॉल अशा विविध स्टॉलची पालकमंत्री लोणीकर यांनी पाहणी केली.