लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन / रामनगर/राजूर : विजेच्या तारेला चिकटून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रामनगर येथे घडली. तर दुसऱ्या घटनेत हिसोडा खुर्द येथे तलावात बुडून ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. ऋषींदर तुकाराम सरकाळे (३२) व अमोल सुदाम गोरे (३२) अशी मयतांची नावे आहेत. या दोन्ही घटना मंगळवारी घडल्या.मंगळवारी सकाळी पाणी भरुन ठेवण्यासाठी ऋषींदर सरकाळे हे शेतात गेले होते. उशिरापर्यंत घरी न आल्याने वडील तुकाराम सरकाळे यांनी शेतात जाऊन पाहिले असता, ऋषींदर हे विजेच्या तारेला चिकटलेले दिसले. ऋषींदर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. फुलचंद मेंगडे, पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. श्रीवास्तव, एस. जे. धायडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.तसेच भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील अमोल सुदाम गोरे हा तरुण कोठाकोळी शिवारात म्हैस चारण्यासाठी गेला होता.दुपारी दोन वाजेच्या सुमारास म्हैस येथील तलावात पाणी पिण्यासाठी गेली. म्हैस खोल पाण्यात जाऊन फसल्याने अमोल गोरे तलावात उडी मारुन तिला वाचवण्यासाठी गेला होता. अमोल गाळात फसल्याने बडून मरण पावला.अन्य घटनेत राजूर एका महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी राजूर येथे घडली. ज्योती अण्णा साबळे (२३) असे मयत तरुणीचे नाव आहे.मयत तरूणीचे आई -वडील जानेफळ येथील शेतात काम करण्यासाठी गेले होते. तर दोघे भाऊ कामानिमित्त बाहेर होते. दुपारी पाच वाजेच्या सुमारास ज्योतीचा भाऊ सोनू हा घरी आला असता, त्याला बहिणीने फाशी घेतल्याचे दिसले.घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे सहायक फौजदार शंकर काटकर, संतोष वाढेकर, गणेश मान्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
वेगवेगळ््या घटनांत तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:08 AM