शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अपघातात बसमधील १५ प्रवासी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:14 AM

विरूध्द दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला बाजू देताना नियंत्रण सुटल्याने गेवराई- पैठण बस तीन फूट नाल्यावर चढली. या अपघातात बसमधील ४५ पैकी १५ प्रवासी गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देट्रॅक्टरमुळे झाला अपघात । बस चढली तीन फूट नाल्यावर: पोलीस, नागरिकांमुळे प्रवाशांवर तातडीने उपचार; बसस्थानकासमोरील घटना

शहागड : विरूध्द दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला बाजू देताना नियंत्रण सुटल्याने गेवराई- पैठण बस तीन फूट नाल्यावर चढली. या अपघातात बसमधील ४५ पैकी १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पोलीस व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे बसमधील जखमींना वेळेत उपचार मिळाले. ही घटना शहागड येथील बसस्थानकासमोरील सर्व्हिस रोडवर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.पैठण येथून ४५ प्रवासी घेऊन निघालेली गेवराई- पैठण बस (क्र.एम.एच.२०- डी.९८६३) शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शहागड येथील उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडने शहागड बसस्थानकाच्या दिशेने येत होती. त्यावेळी मुरूम भरलेला टॅक्टर त्याच सर्व्हिस रोडवरून विरूद्ध दिशेने जात होता. सर्व्हिस रोडवर उभी वाहने, त्याबाजूने विरूद्ध दिशेने जाणारे टॅक्टर असा प्रसंग आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ही बस पाहता पाहता बाजूला असलेल्या तीन फुट नाल्यावरी चढली. तर मुरूम भरलेल्या टॅक्टरची ट्रॉली बसला घासत बसचा पत्रा फाडत निघून गेला. या अपघातात बसचालक रमेश देवराव सिंडाम यांच्यासह सुमय्या शाकीर आतार (रा. पिंपळनेर जि. बीड), नामदेव हरी आव्हाड, शशिकला नामदेव आव्हाड (रा.पाथरवाला बु. ता.अंबड), लक्ष्मण राजप्पा धनरवाड (रा. आपेगाव ता.अंबड), देऊबाई दशरथ सानप (रा. रेवकी देवकी ता.गेवराई), चंद्रभागा नामदेव शेंडगे (धाकलगाव ता.अंबड), आश्व मधुकर कुटुंबे (रा. बागपिंपळगाव ता.गेवराई), जालिंदर बाबुराव शेंडगे (रा.धाकलगाव ता.अंबड) यांच्यासह इतर प्रवासी जखमी झाले.बंदोबस्तावरील पोउपनि हनुमंत वारे, जमादार अखतर शेख, भास्कर आहेर, मदन गायकवाड, अजय राजपूत, गणेश बुजाडे, सामाजिक कार्यकर्ते सिराज काझी, इद्रिस शहा, दत्ता ढगे आदींनी पोलीस व्हॅन, खाजगी वाहनात, रुग्णवाहिकेत गंभीर जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान, मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.क्रेनच्या सहाय्याने बस केली रस्त्याच्या बाजूलागेवराई - पैठण बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन फूट नाल्यावर बस चढली होती. प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर बस तेथेच उभा होती. मात्र, होणारी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी तातडीने आयआरबी खासगी कंपनीच्या क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला केली.ट्रॅक्टर घेतले ताब्यातअपघातानंतर घटनास्थळावरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेले ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. जखमींना ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी तातडीने मदत करून दाखविलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघात