लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेंदरी बोंड अळीने गेल्यावर्षी शेतक-यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणा-या कपाशीवर मोठा हल्ला चढवत हैराण केले होते. त्यामुळे यंदा खरिपात शेतकरी कपाशीच्या बीटी बियाणांकडे वळणार नाही, असे बोलले जात होते. मात्र, बाजारात फेरफटका मारला असता कपाशीच्या बियाणांना चांगली मागणी असल्याचे दिसून आले.यंदा हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज निदान सध्या तरी खरा ठरत असल्याने शेतक-यांमध्ये आनंदी वातावरण आहे. खरिपाची तयारी शेतक-यांनी जवळपास पूर्ण केली असून, आता बियाणे खरदेसाठी बाजारात लगबग दिसून येत आहे. यंदा कृषी विभागाने देखील चांगले नियोजन करून बीटी बियाणे बाजारात आणली आहेत. असे असले तरी या कपाशीच्या बियाणांना शेतक-यांकडून मोठी मागणी कायम आहे. गेल्यावर्षी शेतक-यांनी बीटीचे वाण लावताना त्या सोबत नॉनबीटीचे बियाणे लावले नसल्याचे काही ठिकाणी दिसून आले, तर काही बियाणे कंपन्यांनी बीटीच्या बियाणांसोबत नॉनबीटीचे बियाणे पाकीटासोबत दिले नसल्याचाही आरोप आहे.एकूणच शेंदरी बोंडअळीने कपाशीवर हल्ला केल्याचे गेल्यावर्षी बºयाच उशिरा शेतक-यांच्या ध्यानात आले. बीटी वाणावर या बोंडअळीचा हल्ला हा फार क्वचितच होत असल्याचे बोलले जाते, मात्र या बोंडअळीचा हल्ला झाला की, नाही हे समजण्यासही बराच उशिर लागतो. बोंडअळीचा हल्ला जरी कपाशीवर झाला असला तरी, वरतून कपाशीचे बोंड हे अत्यंत चांगले आणि सुस्थित असल्याचे दिसते, मात्र ज्यावेळी कपाशची वेचणी करण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे कृषी विभागातील अधिका-यांनी सांगितले. साधारपणे ७० मिलिमिटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यावरच शेतक-यांनी खरिपाची पेरणी करावी असे आवाहन शेतक-यांना कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
यंदाही शेतकऱ्यांचा कल कपाशीकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:51 AM