शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

भाजपला धडा शिकविण्याची हीच वेळ- धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:54 AM

भोकरदन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भ्रमनिरास करणा-या भाजप सरकारला धडा शिकविण्याची हीच निर्णायक वेळ आहे, ...

भोकरदन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भ्रमनिरास करणा-या भाजप सरकारला धडा शिकविण्याची हीच निर्णायक वेळ आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी गटनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भोकरदन येथील उपविभागीय कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या वतीने सोमवारी करण्यात आलेल्या हल्लोबाल आंदोलनात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली.पंचायत समिती कार्यालयापासून या हल्लाबोल मोर्चाला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे, आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी खा़ पुंडलिकराव दानवे, माजी आ़ चंद्रकांत दानवे, माजी आ़ कल्याण काळे, राजाभाऊ देशमुख, डॉ. निसार देशमुख, कदीर मौलाना, बबलू चौधरी, लक्ष्मण ठोंबरे, राजेश चव्हाण, सुधाकर दानवे, रामदास पालोदकर, केशवराव तायडे, इरफानउद्दिन सिद्दीकी, दीपक वाकडे, केशव जंजाळ, नय्युम कादरी, महेश औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैलगाडीसह काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी व सर्वसामान्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.यावेळी मुंडे म्हणाले, की भाजप सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. शेतमालास भाव नाही, जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आला आहे. कर्जमाफीची घोषणा केली, परंतु अद्याप एकाही शेतक-याला त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात जनता हैराण झाल्याने या मोेर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकºयाना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी खा. रावसाहेब दानवे व आ. संतोष दानवे यांच्या कारभारावर चौफेर टीका केली.---------------घड्याळाला हाताची साथभोकरदन येथील राष्ट्रवादीच्या या हल्लाबोल मोर्चासाठी काँॅग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदार संघातून मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाला काँग्रेसचा हात मिळाल्यामुळे मोर्चा यशस्वी झाल्याची चर्चा होती.-----------------दानवेंना पराभूत करीन, तेव्हाच डोक्यावर केस- सत्तारअर्जुनास्त्राच्या मदतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे यांचा येणा-या लोकसभा निवडणुकीत पराभव केल्यानंतरच आपण डोक्यावर केस ठेवू. उंदरांनीच देशमुखांच्या गढ्या पोखरल्या, हे आम्हाला उंदरांच्या फौजा समजणा-यांनी लक्षात ठेवावे. कल्याण काळेंचा सुध्दा बिस्मिल्ला आपणच केला, असे सत्तार म्हणाले.------------...तरच भाजप प्रदेशाध्यक्षांचे वजनआ़ टोपे म्हणाले की, भाजपाच्या सरकारातील नेत्यांनी शेतक-यांना कर्जमाफी मिळण्याआधीच जागोजागी अभिनंदनाचे होर्डिंग लावून उतावळेपणाचा कळस गाठला. बोंडअळीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी ५०० रुपये बोनस मिळवून दिले तर त्यांचे सरकारमध्ये वजन आहे, असे आपण समजू.------------------