लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छता मिशनअंतर्गत जिल्ह्यातील जे कुटुंब २०१२ च्या शौचालयाच्या अनुदानापासून वंचित राहिले होते. त्या वंचित कुटुंबांना शौचालयाचे अनुदान मिळणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३७ हजार ३७७ लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती जि.प. च्या स्वच्छ भारत मिशनच्यावतीने देण्यात आली.देश हागंणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने स्वच्छ भारत मशीन योजना सुरु करण्यात आली. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देण्यात आले.२०१२ साली २ लाख ६२ हजार कुटुंबांपैकी १ लाख ७४ हजार कुटुंबांना शौचालय देण्यात आले. या सर्वेक्षणातच काही कटुंब शौचालय अनुदानापासून वंचित राहिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने जि.प. च्या स्वच्छ भारत मिशन विभागाला वंचित कुटुंबांची माहिती जमा करण्याचे आदेश दिले होते.त्यानूसार जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाच्यावतीने जिल्हाभरात पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३७ हजार ३७७ कुटुंब वंचित असल्याचे समोर आले.या वंचित लाभार्थ्यांना लवकरच अनुदान देण्यात येणार असून, या लाभार्थ्यांनी त्वरीत अनुदान घेवून जाण्याचे आव्हान जि.प.च्या स्वच्छ भारत मिशनच्यावतीने करण्यात आले आहे.समाजातील अंधश्रद्धा, व अनिष्ठ रुढी परंपरांवर प्रबोधन करुन आदर्श समाज निर्मितीसाठी मह्त्वपूर्ण योगदान देणारा वारकरी संप्रदायजिल्ह्यातील हागणदारीवर प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन करणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी वारकरी सांप्रदायाचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे...तरच मिळणार लाभजिल्ह्यातील जी कुटुंबे शौचालयापासून वंचित आहेत अशा कुटुंबाची माहिती जमा करून एकत्रितपणे ती एसबीएम व एमआयएस वर अपलोड करावयाची आहे. परंतु जोपर्यंत ही माहिती दिली जाणार नाही. तोवर लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही.
वंचित लाभार्थ्यांना मिळणार शौचालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 12:42 AM