लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दीपावलीनिमित्त खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. असे असताना वाहतुकीचे नियोजन कोलमडल्याने अनेकांची गैरसोय होत असून त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाहनधारकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. याकडे पोलिसांनीही दुर्लक्ष केले आहे. यामुळे बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, सिंधी बाजार, पाणीवेस, कचेरी रोड, शनिमंदिर या गर्दीच्या ठिकाणी अवैध वाहनधारक रस्त्याने सुसाट वाहने दामटत आहेत. तर काही जण सर्रास रस्त्यावर दुचाकी, चारचाकी पाहने पार्क करीत आहेत. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमणात वाहतूक कोंडी होत असून याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र पोलिसांनी सर्रास दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.या वाहतूक कोंडीचा घराबाहेर पडणाºया नोकरदार वर्गांसह सर्वसामान्य नागरिंकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सणासुदीच्या काळात वाहतूक कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:36 AM