लोकमत न्यूज नेटवर्कवाटूर फाटा : येथील मुख्यमार्गावर अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाल्याने दूरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पोलीस नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना या कोंडीचा त्रास झाला.तालुक्यातील बाजापेठेचे गाव असल्याने विविध साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थ गावात येतात. रविवार असल्याने बऱ्यापैकी लग्न सोहळ होते. यामुळे गावात वाहनांची वर्दळ वाढली होती. आधीच गावातील मुख्य रस्ता अरुंद आहे. गावात वाहने लावण्यासाठी कुठलीच सुविधा नसल्याने जागा दिसेल तेथे वाहनधारक आपली वाहने लावतात. यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. रविवारी दुपारी दीडवाजेच्या सुमारास रस्त्यावरील वाहने, हातगाडया यामुळे जड वाहनांना जाण्यास अडचणी आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे जालना मंठा या हायवे रोडवर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे पोलिसांकडे तक्रारी करुनही कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.ग्रामपंचायतने सहा महिन्यात अगोदर नो पार्किंगचे परिसरात फलक लावले पोलीस निरीक्षक रेंग यांच्या हस्ते फलकाचे आनावरण केले होते. असे असतानासुध्दा परिसरात सर्रासपणे रस्त्यावर वाहनेल लावण्यात येते याकडे पोलिसांचे कायम दुर्लक्ष होत आहे.या वाहतूककोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिक आणि परिसरातील दुकानदारांना होतो. वाहनचालक नो पार्किंगमध्ये गाडी लावत असेल तर त्यावर कारवाई होण अपेक्षित आहे. मात्र याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहे.
मुख्य रस्त्यावरच वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:16 AM