दिवसेंदिवस शेतकरी वापरत असलेल्या अतिरिक्त रासायनिक औषधीच्या मात्रेमुळे मृदेचा होणारा ऱ्हास व त्यामुळे मानवी जीवनावर होणारे विविध दुष्परिणाम याविषयी महत्त्व पटवून दिले. सोबतच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत विविध प्रकारचे जिवाणू खते, जीवामृत, अमृतपाणी, दशपर्णी अर्क इत्यादी जैविक औषधी वापरण्यास प्रोत्साहित केले. रासायनिक औषधाच्या व्यतिरिक्त लिंबोळी अर्क वापरून भरघोस उत्पन्न वाढीचा कानमंत्रही दिला. तसेच लिंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत समजावून सांगितली. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते. यासाठी कृषिकन्या पूजा वाघमारे व सरला फुल्लारे या उपस्थित होत्या. यावेळी प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक प्रा. मोहजितसिंग राजपूत, प्रा. विलास चव्हाण, प्रा. मंगेश धांडे, प्रा. शुभम काकड यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शेतकरी किरण भोरजे, सदाशिव भोरज आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:32 AM