शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

ट्रकने चिरडले, दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:59 PM

अंबड : दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री जालना-अंबड रस्त्यावर घडली. ...

अंबड : दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री जालना-अंबड रस्त्यावर घडली.बुधवारी रात्री आठच्या सुमारास अंबड शहरातील पठाण मोहल्ला येथील शेख फेरोज शेख शमशुद्दीन (३२) व अय्याज खान महेमूद खान पठाण (३०) आपल्या दुचाकीने (एम.एच.२१ -५८७०) जालन्याहून अंबडकडे येत होते. आठ वाजेच्या सुमारास पाठीमागून येणाºया कारने (एमएच.२० सीएस.७४२०) या दुचाकीस मागून धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. त्याच वेळी समोरून येणाºया ट्रकने दोघांना चिरडले. या अपघातात शेख फेरोज जागीच ठार झाला तर अय्याज खान हा गंभीर जखमी झाला आहे. अय्याज खान याला अंबड उपजिल्हा रुग्णालयातून प्रारंभी जालना व नंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. मृत दोघांवर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.राष्ट्रपतींना निवेदन....जालना - अंबड - वडीगोद्री रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बुधवारी झालेल्या अपघातातील मयत अयाज खान यांचे वडील महेमूद खान पठाण यांनी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जिल्हाधिकाºयांमार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे केली. मयताच्या वारसांना १५ लाखांची मदत करावी, वारसांना सरकारी सेवेत सामील करावे, जालना - अंबड रस्त्याची चौपदरीकरण करण्यात यावे या मागण्यांचा उल्लेख निवेदनात आहे.