लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराच्या विकासाला आपण सातत्याने प्राधान्य दिले आहे. या पुढील काळात शहराच्या विकासाला अधिक गती देऊन शहरवासियांचे स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न साकार करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलताना दिली.शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील रोकडे हनुमान मंदिराजवळ नगर पालिका निधीतून १२ लक्ष रुपये खर्चुन करण्यात येणाऱ्या भूमिगत गटार व सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. गोरंट्याल व नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक जगदीश भरतिया, पाणीपुरवठा सभापती रमेश गौरक्षक, स्वच्छता सभापती जीवन सले, नगरसेवक विनोद रत्नपारखे, वाघमारे, सुनिल भुरेवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना आ. गोरंट्याल म्हणाले, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या कार्यकाळात शहरातील प्रत्येक प्रभागात अंतर्गत जलवाहिनीअंतर्गत सिमेंट रस्ते यासह अनेक विकासाची कामे मार्गी लावण्यात आली आहेत. नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण कटीबध्द असून शहराच्या विकासाला आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. आमदार झाल्यानंतर आज प्रथमच विकास कामांचे उद्घाटन करत असून विकासाची ही प्रक्रिया या पुढील काळातही निरंतर सुरुच राहिल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक, महिला भगिनी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छ, सुंदर शहराचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न - कैलास गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:47 AM