शहरं
Join us  
Trending Stories
1
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
2
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
3
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
4
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
6
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
7
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
9
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
12
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
13
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
14
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
16
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
17
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
18
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
20
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!

घरफोडी करणारे दोन आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:48 AM

जाफराबाद येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जाफराबाद येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संजयसिंग कृष्णासिंग कबुली, अर्जुनसिंग छगनसिंग भोंड असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्या मार्फेत माहिती मिळाली की, १० नोव्हेंबर रोजी जाफराबाद येथे चार दुकानांचे शटर तोडून संजयसिंग भादा याने त्याच्या साथीदारसह घरफोडी केली. या माहितीवरून त्यांनी संजयसिंग भादा याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सदरील गुन्हा साथीदार अर्जुनसिंग छगनसिंग भोंड व करणसिंग छगनसिंग भोंड याच्यासह केल्याची कबूली दिली. त्यानंतर गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार (क्रं.एम. एच. २० वाय. ८५५९) ताब्यात घेवून कारची पाहणी केली असता, कारमध्ये ६५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने मिळून आले. त्याच्याकडून चांदीचे दागीने व कार असा एकूण २ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याचा साथीदार अर्जुनसिंग छगनसिंग भोंड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७ हजार ५०० रुपये मिळून आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, कांबळे, तेलंग्रे, तंगे, साबळे, गडदे, बाविस्कर, वैराळ, चौधरी, चेके, धुमाळ, संदिप मांन्टे, लखनसिंग पचलोरे, महिला कर्मचारी मंदा बनसोडे यांनी केली.जालना : सोनलनगर येथील चोरी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींनी आणखी तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. दोन महिन्यापूर्वी सोनलनगर येथील गणेश भवर यांच्या घरी भरदिवसा घरफोडी केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी स्वप्नील रमेश कुलकर्णी (रा. करमाड ता. जि. औरंगाबाद), सूर्यकांत गोपीनाथ जाधव यांना अटक केली होती.पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता आणखी घरफोड्यांची कबुली त्यांनी जालना शहरातील सोनलनगर भागात दोन व सुखशांतीनगर भागात एक अशा तीन ठिकाणी चोरी करुन ऐवज चोरी केल्याची दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकtheftचोरी