लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी, व सीएए ,कायद्याच्या विरोधात सर्व संघटनांच्या वतीने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासमोर केले गेले. या ठिय्या आंदोलनाला सर्व भाजप वगळून सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला.या धरणे आंदोलनाची सुरुवात संविधानाची प्रस्तावना वाचून शपथ घेण्यात आली. तसेच व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारने संविधान विरोधात एनआरसी व सीएए हा जाचक कायदा लागू केल्याने देशात अराजकता माजली असल्याचे सांगितले. सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरून संपूर्ण देशात लोकशाही मार्गाने विरोध दर्शवित आहे.केंद्र सरकारने संमत केलेला हा कायदा संविधान विरोधी असून भारतीय नागरिकांमध्ये भेदभाव करणारे असल्याने समानता व बंधुत्व या तत्त्वांना छेद देणारा असून, तो तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.या संघटनांनी दिला होता पाठिंबा.....जमियत उलेमाहिंद (महेमूद मदनी), तब्लीगी जमात, पैयामे ईन्सानियत, मराठा सेवा संघ, टिपू सुलतान युवा मंच, भीमशक्ती, बहुजन क्रांती मोर्चा, मानव मुक्ती मिशन, शिवमुद्रा प्रतिष्ठान, लहुजी क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, जमियत उलेमा हिंद (अर्शद मदनी), तवक्कल ग्रुप, हमदर्द मिल्लत संघटना, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्यासह अनेक संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
मंठा येथे दोन दिवसीय आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 1:15 AM