लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथील बसस्थानक परिसरात दोन गटांत झालेल्या भांडणातून गुरुवारी बदनापूर ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अकरमखान अब्दुल मजीद खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी मटणाचे दुकान बंद करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून कुटुंबासह ठार मारण्याची धमक्या दिल्या. मारहाण करून एक मोबाईल, गळ्यातील सोन्याची साखळी व नगदी १४ हजार रु. काढून घेतले. घेतले. त्यानुसार दीडशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटातील जमीर नवाब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपींनी दहा हजाराची मागणी करत खिशातील चाळीस हजार रूपये काढून घेतले. आईच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. त्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन गटांत भांडण; दीडशे जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:46 AM