लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने लोखंडी पाईप तोडल्याने पाईप का तोडला, असे विचारण्यास गेले असता वाद होऊन लाठ्या - काठ्यांनी दोन गावातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.गोंदी येथून (एम. एच.-२१- ६३२२) ही हायवा पाथरवाला खुर्द मार्गे वडीगोद्रीकडे येत असताना पाथरवाला खुर्द येथील युवकांनी अवैध वाळू वाहतूक करणाºया हायवा अडवल्या कारणाने गोंदी येथील काही तरुणांनी घटनास्थळी येऊन दोन गटात वाद होऊन लाठ्या - काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली.त्यानंतर पाथरवाला खुर्द येथील काही तरूण गोंदी गावात गेले. गावात जाताच गोंदी येथील वाळू माफियांनी या आलेल्या चार वाहनांवर तुफान दगडफेक केली यामध्ये महिंद्रा मॅक्स, फियाट, कार (एम. एच. २१ व्ही २५५७), (एम. एच. २०-९९५५) स्विफ्ट कार व इतर एक वाहन या चार वाहनांची नासधूस केली.त्यावेळी पाथरवाला खुर्द येथील जमावावर वाळूमाफियांनी इमारतीच्या गच्चीवरून तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत पाथरवाला खुर्द येथील रमेश ढवळे, शेखर कर्डीलेसह अनेक गावकरी गंभीररीत्या जखमी झाले.यातील रमेश ढवळे यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. गोंदी पोलीस ठाण्यात साथीदार जमा केल्याने दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये गोंदी येथील गोलू तिवारी, आकाश भोंडे, गजानन सोळुंके, किशोर खरात, विश्वंभर खरात,पाराजी शिंदे, पप्पू गात, व पाथरवाला खुर्द, येथील घनश्याम हर्षे, शेखर कर्डिले, ज्ञानेश्वर तावरे, रमेश लेंडाळ, प्रभू मरकड, सुरेश पाचुंदे, रामा तावरे, राजू पिसाळ, अशोक पाचुंदे आदींवर गुन्हे दाखल आहेत.
दोन गटांत तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:55 PM