शहरातील शनिमंदिर, गांधीचमन, टाऊन हॉल, पाणीवेस या भागात मोठ्या प्रमाणावर पााणी साचते ते आजही मोठ्या प्रमाणावर साचल्याने अनेक वाहन चालकांच्या सायलेन्सरमध्ये पाणी घुसल्याने दुचाकी, रिक्षा बंद पडल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जालन्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना हेडलाइट लावून ती चालवावी लागली.
आष्टीत सलगत तीन तास पाऊस
परतूर तालुक्यातील आष्टी येथे बुधवारी दुपारी दोन वाजेनंतर जोरदार पाऊस झाला. हा पाऊस सायंकाळपर्यंत सुरूच होता. त्यमुळे आष्टीसह परिसरातील शेतांमध्ये पाणीच पाणी झाले होते. अनेक शेतांचे बांध फुटून शेतांना तळ्यांचे रूप आले होते. याआधी देखील आष्टी व परिसरात दमदार पाऊस झाल्याने पिके तरारली होती; परंतु आजचा पाऊस हा या पिकांसाठी धोकादायक ठरू शकतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यास मशागतीची कामे लांबण्यासह पिकांची वाढही खुंटते, असेही शेतकरी बाबासाहेब सोळुंके यांनी सांगितले.