शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

दोन वर्षात साडेसहा हजार शेततळी मंजूर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:06 AM

राज्य सरकारने शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला राज्यासह जालना जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील सिंचनाचे श्रेत्र वाढावे तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळावे, या हेतूने राज्य सरकारने शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला राज्यासह जालना जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन वर्षांत योजनेअतंर्गत जिल्ह्यात ६ हजार ४५० शेततळी तयार करण्यात आली.गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती पूर्णत : पावसावर अवलंबून आहे. याचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी राज्य सरकारने २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. जलसंधारणच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच सुरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणे. हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. दरम्यान, सदरील योजनेतंर्गत पारदर्शकता यावी. म्हणून सरकारने इच्छुक शेतक-यांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते.त्यानुसार जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. जिल्ह्यासाठी सरकारने कृषी विभागाला ६ हजार शेतळ््याचे उदीष्ट दिले होते. त्यानुसार मागील दोन वर्षांत ६ हजार ४५० शेततळे कृषी विभागाने शेतक-यांना वाटप केली. तसेच यातील ११८ शेतळ््याची कामे सुरू आहे.यासाठी शासनाकडून २९ लाख १४ हजार ८६ रुपये खर्च करण्यात आले आहे. यात जालना तालुक्यात ११३७, बदनापूर ९८१, भोकरदन १८८६, जाफराबाद ४१५, परतूर ३४८, मंठा २६०, अंबड ९६५, घनसावंगी ५५९, अशी शेततळे तयार करण्यात आले आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी