शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

वाळू माफियाकडून दोन तलाठ्यांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:46 PM

जप्त केलेले वाळूचे टिप्पर राजूर येथून तहसीलमध्ये घेऊन जाणाºया दोन तलाठ्यांचे वाळू माफियाने अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली. या तलाठ्यांना धावत्या वाहनातून ढकलून देण्याचाही प्रयत्न केला.

ठळक मुद्देग्रामस्थांच्या मदतीने केली सुटका

भोकरदन (जि. जालना) : जप्त केलेले वाळूचे टिप्पर राजूर येथून तहसीलमध्ये घेऊन जाणा-या दोन तलाठ्यांचे वाळू माफियाने अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली.  या तलाठ्यांना धावत्या  वाहनातून ढकलून देण्याचाही प्रयत्न केला. रविवारी सकाळी आठच्या सुमारास बरंजळा ठोंबरे ते जवखेडा ठोंबरे दरम्यान पंधरा किलोमीटर हा थरार सुरू होता. पोलीस व महसूल पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने ट्रक अडवून तलाठ्यांची सुटका केली.

 तहसीलदार संगीता कोल्हे यांच्या पथकाने रविवारी सकाळी सातच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली. यात राजूर चौफुलीवर त्यांनी एका टिप्परला (एमएच. २०, बीटी. १९२५ ) तीन ब्रास अवैध वाळूची वाहतूक करताना पकडले. चालकाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. तहसीलदारांच्या सूचनेवरून  चालक संतोष शिंदेला घेऊन तलाठी भागवत जाधव व रामेश्वर कांबळे हे जप्त केलेल्या टिप्परला घेऊन भोकरदन  तहसीलकडे निघाले. काही अंतरावर अचानक एका जीपने  टिप्परचा रस्ता अडवला व त्यामधून आलेल्या सर्जेराव नामेदव चव्हाण ( रा. मानदेऊळगाव ता. बदनापूर ) याने दोन्ही तलाठ्यांना जिवे मारण्याची धमकी देत खाली उतरण्यास सांगितले. दोन्ही तलाठी धमकीला न जुमानता  टीपरमध्येच बसून राहिले. यामुळे संतापलेल्या त्या व्यक्तीने चालकाला खाली उतरवत टिपरचा ताबा घेतला.

भरधाव टिप्परला बरंजळा रोडवर नेले. या दरम्यान तहसीलदार संगीता कोल्हे यांचे पथक टिप्परचा पाठलाग करत होते. तहसीलदार कोल्हे यांनी फोनवरून सदर प्रकाराची माहिती हसनबााद ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक किरण बिडवे यांनी दिली. पोलीस व महसूल पथकाने टिप्परचा पंधरा किलोमीटर पाठलाग केला. भरधाव टिप्परने जवखेडा ठोंबरे या गावाजवळ एका दुचाकीस्वारास हूल दिली, पुढे एका मुलीला व बैलगाडीला उडवण्याचा प्रयत्न केला.

याच दरम्यान टिपरमधील वाळू रस्त्यावर टाकत चालकाने वेग वाढवला. दोन्ही तलाठ्यांनी मोबाईलवरून तहसीलदार कोल्हे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांना शिवीगाळ करत, मी टिप्पर खड्ड्यात घालून उडी मारेल व तुम्हाला जीव मारेल, तुमच्या तहसीलदारांनाही जीवे मारेल अशी धमकी दिली. तसेच त्यांना टिप्परमधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला.

हा सर्व प्रकार लक्षात येताच बालाजी लोखंडे या ग्रामस्थाने   जवखेडा ग्रामस्थांना सावध केले. ग्रामस्थांनी रस्त्यावर उभे राहत टिप्पर चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने ग्रामस्थांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी रस्त्यावर दगड टाकलेले असल्याने टिपर पुढे जाऊ शकला नाही. यानंतर कोल्हे यांचे वाहनही पाठलाग करत तिथे पोहचले.

त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला ताब्यात घेतले व त्याच वेळी पोहचलेल्या  सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एस. सिरसाट यांच्या पथकाच्या स्वाधीन केले. यानंतर चालक सर्जेराव नामेदव चव्हाण ( रा. मानदेऊळगाव ता. बदनापूर ) याला भोकरदन पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणी तहसीलदार कोल्हे यांच्या फिर्यादीवरून संशयित चव्हाणविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणि अवैध गौण खनिज वाहतूक करणे या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.