लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव रेणुकाई / चंदनझिरा : पुलाच्या सरंक्षण कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नदीपात्रात पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील धामनगाव धाड येथे गुरुवारी रात्री घडली. सचिन विठोबा कानडजे (२६) असे मयत युवकाचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत रस्त्याने पायी जात असलेल्या एकास वाहनाने चिरडल्याची घटना चंदनझिरा परिसरातील तंत्रनिकेत समोर घडली.कुलमखेड येथील सचिन विठोबा कानडजे हा डोमरूळ येथून आपल्या गावी दुचाकीवर येत होता. दरम्यान, धाड नजीक बाणगंगा नदीवरील संरक्षक लोखंडी अँगलला त्याची दुचाकी जोरात धडकली. दुचाकीची धडक जोरात असल्याने तो सरळ नदीपात्रात पुलावरून पडला. त्यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच गावातील तरुणांनी त्यास तात्काळ रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच धाड येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन मुंडे, पोलिस कॉन्स्टेबल गजानन मोरे, ऋषीकेश पालवे, बळीराम खंडागळे हे करत आहेत.पुलाचा परिसर अपघात प्रवण धाड गावानजीकचा बाणगंगा नदीवरील हा पूल गेल्या काही दिवसापासून अपघात प्रवण बनला आहे. पुलाला मजबूत कठडे नसल्याने अपघात होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सचिन कानडजे यांच्यावर शुक्रवारी कुलमखेड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठारचंदनझिरा: जालना -औरंगाबाद रोडवरील शासकीय तंत्रनिकेतनसमोर गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पायी जाणाºया इसमास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.या इसमाची अजूनही ओळख पटलेली नाही. त्याच्या अंगात चॉकलेटी चौकडा शर्ट, उजव्या हातात काळा धागा व गळ्यात तुळशीची माळ आहे.अज्ञात वाहन चालकाविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.उप.नि.नजीर शेख करीत आहे.
अपघातात दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:32 AM