लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : भरधाव रुग्णवाहिकेने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षातील दोनजण जागीच ठार झाले. मंठा-जिंतूर मार्गावरील कर्णावळ फाट्याजवळ बुधवारी सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.जिंतूरहून मंठ्याकडे मीठ घेवून येणाऱ्या अपेरिक्षाला (क्र. एमएच.२२, एए ३३२६) मंठा शहरापासून सात किलोमीटर अंतरावरील कर्णावळ फाट्याजवळ जिंतूरकडे जाणाºया रुग्णवाहिकेने (एमएच.२२,एए. ३०८५) जोरदार धडक दिली. त्यामुळे ेरिक्षाचा समोरील भाग पूर्णपणे चेपला गेला. यात रिक्षातील महेबूब शेख करीम शेख व रशीद शेख छोटू (रा.जिंतूर, जि. परभणी) हे दोघे जागीच ठार झाले. अपघातानंतर रुग्णवाहिका चालक घटनास्थळी न थांबता रुग्णवाहिला सोडून पळून गेला.माहिती मिळाल्यानंतर मंठा पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी शेख मकसूद शेख लालमियाँ (रा.जिंतूर) यांच्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालकाविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख आलमगीर तपास करत आहेत.
रुग्णवाहिकेच्या धडकेत दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:05 AM