लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील प्रसिध्द जाळीच्या देवाच्या यात्रेनिमित्त मंगळवारी मराठवाडा, विदर्भातील भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली होती. तब्बल दोन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.दरवर्षी माघी पौर्णिमेला येथे यात्रा भरते. महानुभाव पंथीय समाजाचे आराध्य दैवत असून, या यात्रेस संपूर्ण भारतातून अनुयायी पालखी रथाचे दर्शनासाठी येतात राज्यातील कानाकोपऱ्यातून पायी दिंड्या येतात. यावर्षी जवळपास दोन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर संस्थानकडून सांगण्यात आले. परिसरात रस्त्याचे काम सुरु असल्याने यात्रेस येणाºया भाविकांना धुळीचा त्रास सहन करावा लागला.यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थितीमुळे यात्रेवर मोठा परिणाम जाणवला. यात्रेत टूरिंग टॉकीज, रहाट पाळण्यासारखे मनोरंजन खेळ न आल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच दुष्काळामुळे उपाहारगृह, खेळणी दुकाने, प्रसादाची दुकाने, भांडी दुकाने आदीवर शुकशुकाट दिसून आला. व्यवसायावर परिणाम झाल्याने दुकानदारांनी सांगितले.सहा दिवस चालणारी यात्रा आता तीनच दिवस भरत आहे. यामुळे राज्यातून दर्शनासाठी येणाºया भाविकांची मोठी गैरसोय होत असल्याचे भाविकांनी सांगितले. यात्रेदरम्यान पारध पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस मित्र मंडळ, सुरक्षा दल, होमगार्ड मित्र मंडळ यांच्या सहकार्याने यात्रेतील गर्दीवर नियंत्रण राहिल्याचे ए.पी.आय.सुदाम भागवत यांनी सांगितले.
दोन लाख भाविकांनी घेतले जाळीच्या देवाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:55 AM