लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील मंठा चौफुलीजवळील रेवगाव फाट्याजवळ एका लक्झरी बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री (एक वाजेच्या सुमारास) घडली. दरम्यान, बसचालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.रविवारी सौरभ बाभळे याचा वाढदिवस होता. रात्री वाढदिवस साजरा करुन तो आणि अल्ताफ बागवान हे दोघे घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकीतील (क्र.एम.एच.२०. सीई.००४३) पेट्रोल संपल्यामुळे ते येथील जांगडे पेट्रोल पंप येथून पेट्रोल टाकून घराकडे जात असताना रेवगाव फाट्याजवळ आल्यावर मंठा चौफूलीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी ट्रॅव्हल्स (क्र.एम.एच. ३८. एफ. ३९९९) ने जोराची धडक दिली. यात दुचाकी स्वार अल्ताफ अन्सार मिया बागवान (वय २३), सौरभ अशोक बाभळे ( वय २३) दोघे ( रा. ढोरपुरा गांधीनगर, जालना) हे जखमी झाले. या दोघांना जिल्हा रुग्णालयात दखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, ही बस हिंगोलीहुन पुण्याला जात होती. याबसमध्ये ३० ते ३२ प्रवाशी होते. तसेच बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून, त्याच्या विरुध्द कदीम खाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रस्ता बनला अपघाताचे ठिकाणमंठा चौफुलीपासून औरंगाबादला जाण्यासाठी या रस्त्याहूनच जड वाहना जावे लागते. त्यामुळे या रस्त्यावरुन खाजगी बसचालक, ट्कचालक भरधाव वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.या अपघातामुळे गांधीनगर परिसरात सोमवारी शोकाकूल वातावरण होते.वाढदिवस ठरला अखेरचा दिवससौरभ बाभळे हा शिवाजी पुतळा येथील एका दुकानावर काम करत होता. सोमवारी २३ वा वाढदिवस असल्यामुळे रविवारी रात्रीच मित्रांनी वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. त्यामुळे रात्री साडेबारा ते एक वाजेच्यासुमारास त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. तो आणि त्याच्या मित्रांनी रात्री शहरातच वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्यामुळे सौरभ खूप आनंदी होता असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. परंतु, त्यानंतर काही मिनींटातच तो हे जग सोडून गेल्याची बातमी कळल्यावर मोठा धक्का आम्हा सर्वांना बसल्याचेही मित्र म्हणाले.बसचालकाने काढला पळहिंगोली येथून पुण्याला निघालेल्या या बसमध्ये ३० ते ३२ प्रवाशी होते. हा अपघात होताच बसचालकांने घटनास्थळावरुन पळ काढला. हा बसचालक हिंगोली येथील असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवलि आहे. दरम्यान, याचा तपास कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. एस. मोरे, कॉस्टेबल विठ्ठल खारडे हे करीत आहे.अल्ताफची इच्छा अपूर्णचअल्ताफ हा बी.कॉमच्या दुसºया वर्षात शिक्षण घेत होता. त्याला एम.बी.ए करुन उद्योजक व्हायचे होते. त्यासाठी तो नेहमी अभ्यास करायचा, असे त्यांच्या भावाने सांगितले. परंतु, त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली.
दुचाकी-बस अपघातात दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:30 AM