एक लाखाची बैलजोडी चोरली
जालना : बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील शेतकरी गणेश बाबासाहेब कोळकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेली एक लाख रुपये किमतीची बैलजौडी चोरट्यांनी चोरून नेली. बुधवारी रात्री वाकुळणी शिवारातील गट क्रमांक १०५ मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी कोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक राठोड अधिक तपास करत आहेत.
एटीएम कार्ड बदलवून घेत ७३ हजारांना गंडविले
जालना : एटीएममधून पैसे काढून देतो, असे म्हणून ५०० रुपये काढून दिले; परंतु याचप्रसंगी दुसरे एटीएम त्या नागरिकाच्या हातात देऊन नंतर एटीएममधून ७३ हजार ५८७ रुपये काढून घेत एकाची फसवणूक केल्याची घटना जालना शहरातील सतकर कॉम्प्लेक्स भागातील एसबीआय एटीएममध्ये घडली आहे.
याप्रकरणी भानुदास गणपत जोशी (रा. लक्ष्मीकांतनगर, जुना जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल साळवे हे करीत आहेत.