शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

दोन दिवसाला एक दुचाकी लंपास.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:38 AM

घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या शहरवासीयांची वाहन चोरांनी झोप उडविली आहे. मागील सहा महिन्यांत जालना शहरातून तब्बल ६५ दुचाकी चोरीस गेल्या आहेत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या शहरवासीयांची वाहन चोरांनी झोप उडविली आहे. मागील सहा महिन्यांत जालना शहरातून तब्बल ६५ दुचाकी चोरीस गेल्या आहेत. यातील केवळ १३ प्रकरणांचा पोलिसांना उलगडा झाला आहे. सरासरी दोन दिवसाला एका दुचाकीची चोरी होत असून, दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभा राहिले आहे.जालना शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह शासकीय कार्यालये, वर्दळीची ठिकाणेच नव्हे तर घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. गाडी चोरून त्याचे स्पेअर पार्ट काढून ते विक्री करण्याची नवी पद्धत सुरु केल्यामुळे या चोरट्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे. पोलिसांनी जुनी दुचाकी विक्री करणाऱ्यांना संबंधित वाहनाची कागदपत्रे असल्याशिवाय दुचाकी विक्री करु नये, अशा नोटिसा पाठविल्या आहे. तरीही कागदपत्रे नसलेल्या वाहनांची खरेदी-विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याचे बोलले आहे. दुचाकी अल्प किमतीत मिळत असल्याने ग्राहकही चोरट्यांच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे पोलीस तपासात वेळोवेळी समोर आले आहे.पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले :जालना शहरात शेकडो पोलीस रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करतात. या पोलिसांना चकवा देऊन ठिकठिकाणी चोºया होत आहेत. त्यात घरासमोर, पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींमधील पेट्रोल चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. काही वर्षापूर्वी पोलिसांनी पेट्रोल चोरांना जेरबंद केले होते. मात्र, सध्या पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले आहेत.‘जीपीएस’ बसविण्याची गरज शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहन चोरी होत आहे. चोरी झालेल्या वाहनांचे लोकेशन तात्काळ मिळावे, यासाठी वाहनधारकांनी आपापल्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्याची गरज असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.चोरीच्या दुचाकीची जालन्यातच विक्री : उद्योगनगरी म्हणून जालना शहराची ओळख आहे. परंतु, सध्या याच उद्योगनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी होत आहे. बुलडाणा, परभणी, हिंगोलीसह इतर जिल्ह्यामधून चोरलेल्या दुचाकींची जालना शहरात विक्री होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.या भागात सर्वाधिक चो-या : शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, सिंधी बाजार, शनि मंदिर, शिवाजी पुतळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दुचाकी लंपास करतात. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीस गेल्या आहेत. वर्दळीच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ची गरज असून शहरातील रेल्वेस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची गर्दी असते. मात्र, रेल्वेस्थानक परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. शिवाय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणीही ‘सीसीटीव्ही’चा अभाव दिसतो. चोरीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी आणि चोरट्यांच्या मुस्क्या अवळण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ बसविणे गरजेचे आहे.दुचाकीचे ‘पोस्ट मॉर्टेम’ : चोरटे दुचाकी चोरी करतात. त्यानंतर एखाद्या भंगार विक्रेत्याकडे ती दुचाकी नेली जाते. त्यानंतर त्या दुचाकीचा एक-एक पार्ट काढला जातो. एखाद्या कारखान्याला या दुचाकीच्या पार्टची विक्री केली जाते.

टॅग्स :bikeबाईकtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी