नाशिक : चारचाकी वाहनांना फास्टॅग लावण्याची डिसेंबरपासूनची अंतिम मुदत वाढवत अखेर १५ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली. त्यानुसार बुधवारी मध्यरात्रीपासून आदेश कार्यान्वित झाला असला तरी अनेक ठिकाणी फास्टॅग मिळणे जिकिरीचे ठरत असल्याने वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. त्यात काही ठिकाणी कार्ड रीड न होणे, नेटवर्कची समस्या तसेच स्थानिक वाहनधारकांना कमी टोल लागण्यासाठी करावी लागणारी रजिस्ट्रेशनची सुविधादेखील वेळखाऊ ठरत असल्याने अनेक वाहनमालकांना भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा सूर वाहनमालकांच्या वतीने व्यक्त होत आहे.रस्त्यावर धावणाऱ्या चारचाकी वाहनांना ‘फास्टॅग’ बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर त्यात वेळोवेळी मुदतवाढ देऊन अंमलबजावणीसाठी १५ जानेवारीची अंतिम मुदत देण्यात आली होती. टोलनाक्यांवर वाहनांचे थांबे संपुष्टात आणण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू असली तरी तांत्रिक कौशल्याच्या अभावामुळे अनेकदा त्यात अडथळे निर्माण होत आहेत. ‘फास्टॅग’ विक्रेत्या एजन्सी किंवा टोल प्लाझांमध्येही तो उपलब्ध करून देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी फास्टॅगचा तुटवडा असल्याने अनेकदा वाहनधारकांना ते उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अद्यापही नाशिकच्या परिघातील शिंदे टोल, पिंपळगाव, घोटी, चांदवड या टोलनाक्यांवर अद्यापही अनेकदा वाहनांची कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक वाहनचालकांनी वाहनांना फास्टॅग लावलेले नसल्यामुळे बहुतांश टोलनाक्यांवर फास्टॅग असलेल्या वाहनचालकांनादेखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काही वाहनचालकांना याबाबत काहीच माहिती नसल्याने ते फास्टॅगच्या रांगेतून घुसल्यास त्यातून दुहेरी शुल्क भरण्याचा नियम दाखवला गेल्यास त्यातून वाद उद्भवून पुन्हा वाहतूक कोंडी होण्याचे प्रकारदेखील घडत आहेत.प्रभावी अंमलबजावणीचा अभावयोजना लागू केल्यानंतर फास्टॅग सुरळीतपणे उपलब्ध होत नसल्याने तिला वारंवार मुदतवाढ द्यावी लागली. अद्यापही मुबलक प्रमाणात आणि सुलभपणे फास्टॅग उपलब्ध नसल्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. शासनाने ज्या एजन्सींची नियुक्ती केली आहे, त्यांनादेखील कार्डची मागणी केल्यानंतर किमान १० दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळेच फास्टॅग बंधनकारक करूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही शक्य झालेली नाही.च्जिल्ह्णातील काही टोलनाक्यांवर अद्यापही नेटवर्कची समस्या असल्याने रीड होत नाही, तर काही नाक्यांवरील कॅमेरे तितकेसे प्रभावी नाहीत. त्यामुळे टोलनाक्यांवरील कर्मचारी टॅगचे स्कॅनिंग हाताने करीत असल्याने अधिक वेळ वाया जाणे सुरूच असून, अपेक्षित परिणाम साधणे शक्य झालेले नसल्याचे चित्र बहुतांश टोलनाक्यांवर आहे.आमच्याकडे सध्या फास्टॅग उपलब्ध आहेत. मात्र, फास्टॅगच्या सुविधेची उपलब्धता ग्राहकांना केल्यानंतर त्यांचे कार्ड प्रत्येक टोलवर रीड होणे आवश्यक आहे. त्यात काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास ग्राहकांनी ज्यांच्याकडून कार्ड घेतले आहे, अशा संबंधित एजन्सीकडेच विचारणा केली जाते. त्यामुळे निदान सर्व टोलनाक्यांवर यंत्रणा सुरळीतपणे कार्यरत असावी, हीच अपेक्षा आहे.- प्रसाद पाटील,सीईओ, विश्वास बॅँक
फास्टॅगची अनुपलब्धता; वाहनधारक त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:19 AM
चारचाकी वाहनांना फास्टॅग लावण्याची डिसेंबरपासूनची अंतिम मुदत वाढवत अखेर १५ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली. त्यानुसार बुधवारी मध्यरात्रीपासून आदेश कार्यान्वित झाला असला तरी अनेक ठिकाणी फास्टॅग मिळणे जिकिरीचे ठरत असल्याने वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. त्यात काही ठिकाणी कार्ड रीड न होणे, नेटवर्कची समस्या तसेच स्थानिक वाहनधारकांना कमी टोल लागण्यासाठी करावी लागणारी रजिस्ट्रेशनची सुविधादेखील वेळखाऊ ठरत असल्याने अनेक वाहनमालकांना भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा सूर वाहनमालकांच्या वतीने व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देनेटवर्कची समस्या जटिल : नोंदणीची सुविधादेखील वेळखाऊ