चंदनझिरा : जालना शहराजवळी आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवरील खदानीजवळ गुरूवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ठेकेदार लक्ष्मण उंबरे (रा. साईमंदिर जवळ, सुंदर नगर) यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी १२ तासाच्या आत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. शाम उर्फ धम्मजित रमेश चिकटे (रा. चंदनझिरा) व जितेंद्र रवी आरसुळ (रा. बदनापूर) अशी ताब्यात घेतल्यांची नावे आहेत. हा खून जुन्या भांडण्याच्या वादातून झाला असल्याचे सांगण्यात आले.
एकाला चंदनझिरा भागातून तर दुसऱ्या आरोपीस बदनापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सपोनि. संदीप सावळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी साई पवार, अनिल काळे यांनी केली आहे.